कठीण प्रसंगी ही न डगमगणारा
आणि सदैव अढळ असणारा.......बाप असतो
हाताचं बोट धरून चालायला शिकवणारा
खांद्यावर कोकरू घेवून फिरणारा

चुकताच कठोर शिक्षा करणारा
यशात पाठीवर कौतुकाची थाप देणारा
आणि आनंदाच्या वेळी प्रेमान जवळ घेणारा.... बाप असतो
मुलांचे हौसेने हट्ट पुरवणारा
आईलाही प्रेमाने नवीन साडी आणणारा
पण स्वतः मात्र साधाच वावरणारा.... बाप असतो
दुखात सर्वाना धीर देणारा
आईलाही आधाराचा खांदा देणारा
स्वतः मात्र एकांतात दोन आश्रू ढाळणारा.. बाप असतो
कुटुंबाच्या कल्याणासाठी झगडणारा
सर्वासाठी कमी जास्त पाहणारा
मात्र स्वतःसाठी नेहमीच कमी करणारा.... बाप असतो
दिव्याप्रमाणे अहोरात्र जळणारा
आणि सर्वाना सुखाचा प्रकाश देणारा
स्वतःसाठी मात्र फक्त अंधारच ठेवणारा ....बाप असतो - प्रतिक देसाई