आठवणीच्या क्षणांना
आज जाग आली
सारी श्रुष्टी पुन्हा
ढगाळून गेली
ढगाळून गेली
पुन्हा एकदा जुन्या
ढगांनी मनावर गर्दी केली
काळ्या ढगाची काळी
सावली पुन्हा सर्वत्र पसरली
वेदनेचा बोचरा वारा
जोराने वाहू लागला
दुखांच्या ढगांशी पाठशिवी
चा खेळ खेळू लागला
क्षणार्धात दुखांचा ढग
वितळूनी गेला
अश्रूंच्या पावसात हा
आठवणींचा निसर्ग भिजला
कडू दुखांच्या रंगाचे
इंद्रधनू नभी उमटले
यातनांच्या मातीचे गंध
चहूकडे दरवळले
आठवणीच्या क्षणांना
आज पुन्हा जाग आली
कोरड्या जखमांना अश्रूंच्या
पावसात भिजवून गेली - प्रतिक देसाई
पावसात भिजवून गेली - प्रतिक देसाई