बाप !

संकटात हिमालयासारखा उभा राहणारा
कठीण प्रसंगी ही न डगमगणारा
आणि सदैव अढळ असणारा.......बाप असतो

हाताचं बोट धरून चालायला शिकवणारा
खांद्यावर कोकरू घेवून फिरणारा
दुखत्या पाठीवरही घोडा करणारा.... बाप असतो

चुकताच कठोर  शिक्षा करणारा
यशात पाठीवर कौतुकाची थाप देणारा
आणि आनंदाच्या वेळी प्रेमान जवळ घेणारा.... बाप असतो

मुलांचे हौसेने  हट्ट पुरवणारा
आईलाही प्रेमाने नवीन साडी आणणारा
पण स्वतः मात्र साधाच वावरणारा.... बाप असतो

दुखात सर्वाना धीर देणारा
आईलाही आधाराचा खांदा देणारा
स्वतः मात्र एकांतात दोन आश्रू ढाळणारा.. बाप असतो

कुटुंबाच्या कल्याणासाठी झगडणारा
सर्वासाठी कमी जास्त पाहणारा
मात्र स्वतःसाठी नेहमीच कमी करणारा.... बाप असतो

दिव्याप्रमाणे अहोरात्र जळणारा
आणि सर्वाना सुखाचा प्रकाश देणारा
स्वतःसाठी मात्र फक्त  अंधारच ठेवणारा ....बाप असतो                                                                 - प्रतिक देसाई


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !





दारात दिवा तेजाचा
प्रकाश चौफेर हर्शाचा
रांगोळीत रंगले रंग सारे
जणू आयुष्य रंगविनारे
ज़ग मगाट सर्वत्र रोशनाइचा
मन उल्हासित करणारा
चकली लाडू तोंड गोड करण्यासाठी
नविन वस्त्रे सोंदर्य खुलवन्यासाठी
फटाक्यांच्या आवाजात दिवाळी आली सजुन
आता इश्वरचरनी एकच मागन मागुन
तुमच्या मनातील होवो पूरी इच्छा
सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
                                        - प्रतिक देसाई

एक फसलेला डाव !



दुः ख  दाटुनी मनात आलं
पाणी पापण्यात तारलं
जिभेवर कडू साचलं
कळवळून हृदय रडलं

असा कोणता खेळ नशिबान मांडला
डावातील फास उलटाची पडला
जिंकण्याचा विचारच सुटला
जणू आयुष्याचा खेळच फसला

सरले नाही मनातले दुः ख
अश्रूंनी खारट सारे मुख
राईपरी भासते सुख
नको वावरी लावू असे मूक

न सहन होते आता ही समीक्षा
नशिबाने कोणती घेतली परीक्षा
मागतो तुझ्याकडे  भिक्षा
नको करी लावू एवढी प्रतीक्षा

पुन्हा नवीन डाव मांडण्याचा यत्न
जिंकण्यासाठी जणू मांडला यज्ञ
आहोरात्र सर्व लावले आहे पणास
आता फक्त जिंकणे हा एकच ध्यास.....
                                             - प्रतिक देसाई

चंद्र तुझा...

आजही त्या चंद्रात चेहरा तुझा दिसतो
डोळ्यांच्या पापण्यात ओलावा दाटतो

चालताना तु सोबत असल्याचा भास होतो
वळून पहिल्यावर मात्र मी एकटाच असतो
हा एकटेपणा खरंच काळीज कापतो
जणू हृदयाला रक्ताचा पाझर फुटतो

नदीचा तो हिरवा घाट आजही तसाच भासतो
आजही तो तेथे बसण्यासाठी मोहात टाकतो
तुझ्या आठवणींना तो आजही उजाळा देतो
तुझ्याविना मात्र तो खरंच निरागस वाटतो

भूतकाळाच्या आरशात आजही तुला पाहतो
तुझी प्रतिमा दिसताच मी सैर भैर  होतो
असा कोणता आघात त्यावरी होतो की...
तुटलेला त्याचा प्रत्येक कण मनाला टोचतो

न राहुनी  ओलावा पुसून  डोळे मिटतो
उघडताक्षणीच तो चंद्र पुन्हा तसाच दिसतो
आठवणींचा झरा पुन्हा वाहू लागतो
दुःखाच्या सागरातच तो विलीन होतो...
                                                          - प्रतिक देसाई