हातावरच्या रेषा !

हातावरच्या रेषा किती भावपूर्ण असतात नाही
रेषाच त्या मात्र किती बोलतात त्या नाही

आयुष्यातल्या दुखांच्या क्षणांप्रमाणे
काही आडव्या 
काही उभ्या
तर काही तिरकासही जातात

मनात दडवून ठेवलेल्या स्वप्नानप्रमाणे
काही भेटतात
काही छेदतात
तर काही जन्मभर दूरच राहतात

हृदयातल्या कडू-गोड आठवणींप्रमाणे
काही ठळक
काही पुसत
तर काही नुकत्याच जन्मलेल्या

सुखद भावनांप्रमाणे
काही आखूड
काही लांब
तर काही असूनही नसल्यासारख्या 

हातावरच्या रेषा तश्या पहिल्या तर रेषाच असतात
मात्र कळल्या तर जीवनाच गुपित सांगून जातात
                                                             - प्रतिक देसाई    

स्वप्ने माझी....

प्रेमात तुझ्या पाहिलेली स्वप्ने
तुझ्या नकाराच्या वादळात सापडली
एकवटून ठेवलेली ती हृदयात
कुठे चोहीकडे विखुरली

अनमोल माझी ती स्वप्ने अशी
का मातीमोल जाहली
रात्ररात्र जागून पाहिलेली ती स्वप्ने
क्षणार्धातच झोपली

स्वप्ने पाहताना एक क्षण हि
वाट नाही पहिली
असे अघटीत घडेल अशी कल्पना हि
मनाला नाही वाटली

विखुरलेली ती स्वप्ने आश्रू
पुसून उचलली
मात्र तुच इथे नसल्यावर
ती अर्थहीन जाहली

तुझ्या प्रेमात पाहिलेली स्वप्ने
स्वप्नेच राहिली
ती हि मला तुझ्यासारखे
परके
करून गेली.
                     -प्रतिक देसाई

कोणीतरी एकच असते !

मैत्रिणी तर बर्याच असतात
मात्र कोणीतरी  एकच असते
जी आपणास जवळची वाटते

मेसेज तर सगळ्याच जणी करतात
मात्र कोणीतरी एकच असते 
जिचे मेसेज पुन्हा पुन्हा वाचले जातात

हसतात तर सगळ्याच जणी मनापासून
मात्र कोणीतरी एकच असते
जिचे हास्य थेट हृदयालाही हसवते

दुख्खात सांत्वन तर सगळ्याच जणी करतात
मात्र कोणीतरी एकच असते
जी आपल्यासोबत दोन आश्रू ढाळते, धीर देते

बोलतात तर सगळ्याच जणी
मात्र कोणीतरी एकच असते
जिचे बोलणे कानात साठवून ठेवावेसे वाटते

भेटतात तर सगळ्याच जणी
मात्र कोणीतरी एकच  असते
जिची भेट मनाला वेड लावते

दोन पावलं सोबत तर सर्वच चालतात
मात्र कोणीतरी एकच असते
जिच्या सोबत आयुष्यभर चालावस वाटत

आयुष्यात सर्वजणी थोड्याच राहतात
मात्र कोणीतरी एकच शेवटपर्यंत राहते
जी नकळतच आवडते, आणि प्रेम बनून राहते
                                                   - प्रतिक देसाई   


आठवण !

आज त्या वाटेवरून जाताना
सहज कॉलेजकडे नजर वळली
त्याच ठिकाणी तर झाली होती
पहिली ओळख आपली
गप्पा-टप्पा , हास्यविनोद पार्किंगमधलं
आणि तुझ ते चोरून पाहन ही आठवल...

थोड पुढे  गेल्यावर
ती बाग  दिसली
त्याच तर ठिकाणी मी तुला
गुलाबाची फुले दिली होती
आणि आठवल होकार कळवताना तुझ गोड लाजण
आणि त्या नंतर तुझ्यामुळेच बदललेलं माझं जगण

आणि पुढे गेल्यावर दिसली
आपली भेटायची ती नेहमीची जागा
जिथेचं तर घेतल्या होत्या आपण प्रेमाच्या आणा-भाका
आठवल, मी उशिरा आल्यावर तुझ ते रुसून बसण...
आणि मग मी तुझी प्रेमान समजूत काढण.....

समोरच मग ते मंदिर लागलं,
दिवसभर उपाशी राहून.......
जेथे तु माझ्यासाठी घडवला  होतास उपवास
तेव्हा मला खरंच आलं होत भरून...
आणि मग शेवटी  मी तुला प्रेमान भरवला होता घास

याच विचारात चालत असताना,
शेवटी लागला तो डांबरी रस्ता काळवंडलेला
ती लोकांची गर्दी, आणि तो गोंधळही आठवला
तुझा तो अपघात व देह रक्तात पडलेला
सर्व काही क्षणार्धात बदललं
आणि माझं हृदय पुन्हा एकदा बंद पडलं
                                                    - प्रतिक देसाई

 
 

गल्लीतलं क्रिकेट !


गल्लीतलं क्रिकेट काही वेगळच असतं
खेळ कमी आणि आरडा ओरडा करणार मच्छी मार्केट असतं...
इथले  असतात वेगळेच नियम
जिंकेल त्याचीच असते पहिली  batting कायम...
एक टप्पा आऊट, दोन डीक्लीअर असे इथे प्रकार
आऊट होता तुम्ही जर चुकून मारली षटकार....
तीन वेळा अंगाला बॉल लागला तर आऊट
किंवा तीन वेळा बॉल मारताना हुकला तरीही आऊट....
इथले संघ सामन्यागणिक बदलतात
आणि सामन्याच्या ओवर प्रकाश्यावरून ठरतात....
ज्याची असेल bat तोच इथे राजा
आणि ज्याचे काहीच नाही त्याला फिल्डिंगची सजा...
ना पंच, ना प्रेक्षक कोणीच तिथे
भिंतीची स्टंप, अडचणीवेळी फळीची bat ही  इथे...
गल्लीतलं क्रिकेट बंद असतं परीक्षेच्या वेळी
आणि सुट्टीत मात्र चालत खांबाच्या उजेडात रात्रीच्याही वेळी...
चिडाचिडी तर इथे नेहमीची
आणि जास्तच झाल तर प्रात्याक्षिके कुस्तीची...
मात्र शेवटी किती काही झाल तरी मरत नाही इथलं क्रिकेट
तेच तर आहे इथलं मोठ्ठ सिक्रेट ...... 
                                                                -  प्रतिक देसाई  

ते दिस हरवले !

कधी सरकले, कधी सरले
काहीच न उमगले
दुनियेच्या या समरात
बालपणीचे सोनेरी दिस हरवले
गोट्या क्रिकेटचे ते दिस
मैदानाच्या धुळीत विरले
चिक्कू, पेरू झाडावरील आंबे
पाला पाचोळ्यात विखुरले
गोळ्या चोकोलेट ते चिकट हात
कुठे आठवणीत दडले
खोपरा गुडग्यावरच्या जखमांचे
व्रण आठवण म्हणून राहिले
एक रुपयाचा तो पेप्सीकोला
पैशाची किंमत शिकवूनी गेला
झाडाखालचा तो हलता झोपला
हलत जग दाखवुनी गेला
लपा-छपी सुखदुखाची
लपंडावानेच शिकवला
संसाराच्या गड्याच्या चाकांचा 
अंदाज भातुकलीतच दिसला 
फटक्याच्या त्या धुरात
क्षण भंगुर आनंद कळले
दगडमातीच्या त्या किल्ल्याने
अभेद्यापणा दर्शवले
कोलमडलेल्या पत्त्याच्या घराने
मोडणारी स्वप्ने दाखवली
जीवनातील चढ उतार
सापशिडीनेच शिकवली
आईच्या त्या माराने
बरे वाईट उमगले
बाबांच्या प्रेमळ शब्दांनी
मनावर ठसे उमटवले
बालपणीचे ते दिस
दुनियादारी सांगुनी गेले
न समजले काही, न गवसले
ते दिस कुठे हरवूनी गेले
                              - प्रतिक देसाई