इंद्रधनुष्य....



आयुष्यातले दिवस तसे ठीकठाक  तर कधी बेरंगी असे,
मात्र तू जेव्हा माझ्या  आयुष्यात आलीस,
तो दिवस इंद्रधनुष्य घेवुन येणारा होता
इंद्रधनुष्य, त्याचे सात रंग ,
आणि  प्रत्येक रंगाला वेगळा  असा अर्थ,
आता तूच पहा की तुझ्यामुळे
माझं आयुष्य किती अर्थमय झालंय ते....
पण खरंच गं कुठे होतीस तू ?
का तू इतके दिवस नव्हतीस..मी तुझी किती वाट पहिली....
आणि तू आता भेटलीस...
का एवढं वाट पहायला  लावलंस .....
आणि तू अशी गं कशी?
गुलाबाच्या पाकळीवर असलेल्या दवबिंदूच्या एका थेम्बपरी मला तू भासतेस...
ज्याला जराही धक्का न लावता त्याच्याकडे तासंतास पहाट राहावं....
आणि प्रत्येक वेळी त्याच्याकडे  पाहताना मनातला आनंद द्विगुणीत व्हावा....
मनाला एक वेगळीच ताकद मिळावी....एक उत्साह मिळावा..
आणि ज्यामुळे आपण जग जिंकलोय असं काही भास व्हावा.....
कुठून आल हे निरागस पणाच वार तुझ्याकडे?
एक छोटस..बागेतल फूल.....
ज्या निरागसतेने डोलत असत..
ज्या निरागसतेने स्वताच्याच
जगात वावरत असत...
त्यापरी निरागसता कुठून आली तुझ्यात...
दूर लांबवर कुठेतरी बासरीच मधून संगीत ऐकू याव..
आणि आयुष्यभर ते ऐकतच राहावं...
असं तुझ गोड बोलन....
कुठून शिकलीस तू?
आकाशात मुक्तपणे विहार करणारा पक्षी...
ज्याला कशाचाच बंधन नाही...
तो त्याच्या मनासारखच वावरतो..
इतका..मुक्त...आणि..वेगळा विचार कसा काय येतो तुला....?
तुझ ते खोट खोट रुसून बसन...किंवा आनंदान मला काहीतरी सांगण..
रोज सकाळच्या वेळेस जसा पारड्यात मोगऱ्याच्या फुलांचा सडा...जसा प्रेमात पडतो..
तसा ते मला पुनपुन्हा तुझ्या प्रेमात पाडत....
नदीच्या पाण्यासारख हवे तिकडे वाहाव..
असं.स्वभाव कसा मिळाला तुला?
खळखळत्या पाण्याचे निर्झर झरे...
जसे पावसात बेभान होवून वाहतात...
आणि त्यांची ती शुद्धता कुठून आली  तुझ्यात..?
पहिल्या पावसानंतरच्या पसरलेल्या सुगंधासारखं काहीच नाही गं...
पण तोही तुझ्यात कुठून आला.?..जो मी एवढ्या दुरूनही  ओळखू शकतो...
संध्याकाळच्या सूर्योदयाचा...तो शांतपणा....आणि ते हवहव  वाटणारा ..
सूर्याचा निस्वार्थी पणा...कुठून मिळाला तुला...?
आकाशातल्या चांदण्याचं ते मोहक रूप...
आणि ते पाहिल्यावर मनाला लागणार वेड..
जे वेड कधीच संपू नये असं वाटत...
जी रात्र कधीच ढळू नये असं वाटत...
तस मोहक रूप कुठून लाभल  तुला?
गुलाबाच्या पाकळी सारखे लाल  नाजूक ओठ
असं वाटत कि त्यांनीच गुलाबाला लाल रंग अर्पण केला आहे  ...
त्यांचा तो मऊपणा....इतका मनात बसतो...
कि त्याची तुलना करणेही केवळ अशक्य .....
आणि त्या ओठातून तयार झालेलं तुझ ते हास्य...
जे पाहून...मी माझी सारी दुः ख विसरतो...
ते हास्य खरंच घायाळ करत गं...
मी तासंतास ते पाहत असतो...आणि काही वेगळच वाटत...
जस कि अचानक थंड पाण्याचे तुषार कुणीतरी अंगावर उडवावेत..
आणि क्षणार्धात सार अंग शहारून जाव...
खरंच काय आहे तुझ्यात ? कि हे शब्द संपतच नाहीत...
हे मन तुझा विचार करन थांबवत नाही..
हे हात नकळतच तुझ्यावर  काहीतरी लिहिण्यासाठी
असुरलेले असतात...
का या डोळ्यांना नेहमी तुझीच प्रतिमा दिसते...
का या मनाला सारखी तुझीच प्रतीक्षा असते
का? हे वेडेपणाच प्रतिक आहे का?
असेलही कदाचित...मग वेडाच समज हव तर मला  ...

                                                                        - प्रतिक देसाई

No comments: