स्मृतीत तुझ्या !

दिवसामागून दिवस असेच सरतील
वाहणारे वारे दिशा बदलतील
नदीचे प्रवाह वेगळे  होतील 
या हृदयात मात्र तुझेच भाव
नेहमी जपून राहतील

आठवणीनी कधी मने कोमेजून जातील
पापण्यात पाणीच सोडून जातील
गालावर वाहणारे ते अश्रू पुसताना
हाथ हे थरथर कापतील
कारण त्यात तुझ्याच प्रेमाचे ओलावे असतील

एकामागून एक असे ऋतू बदलतील
पावसात मात्र तुझी आठवण येईल
बेभान होवून भिजतान तु आठवशील
मात्र तुझ्याविन ते पावसाचे
थेंबही  कौड़ीमोल ठरतील

कधी तुझ्या आठवणींनी मन सैर भैर होईल
तुला भेटण्यासाठी मन व्याकूळ होईल
जीवही कदाचित गुदमरून जाईल
तेव्हा डोळे बंद करून घेईन आणि क्षणार्धात
तुझी प्रतिमाच समोर उभी राहील  


लाखोंच्या गर्दीतही राहून एकटाच होईल
सर्व दिशांना तुला शोधण्याचा यत्न होईल
दाही दिशांना बंद भिंतीच दिसतील
अंधारमय काळ्या कोठड्याच मिळतील
मात्र तु फक्त माझ्या आठवणीतच सापडशील
                              
                            - प्रतिक देसाई

2 comments:

Anonymous said...

its amazing and very true!

Ojas said...

maverick....