झाल गेलं सगळ
विसरून जायचं आहे
पुन्हा नवीन सुरवात
करून पाहायचं आहे
सदाचाराच्या मार्गावर
एकदातरी चालायचं आहे
चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं आहे
सुखाच्या सावलीत दोन
घटका बसायचं आहे
प्रशांत वृक्षाला थोडा
वेळ टेकायच आहे
मनाच्या समाधानासाठी
तरी जागून पाहायचं आहे
चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं आहे
बाहेरचा मोकळा शवास
मला घ्यायचा आहे
यश काय असत हे
चाखून पाहायचं आहे
एक दिवस तरी ताठ
मानेन वावरायचं आहे
चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं आहे
एक एक क्षण जगणे
कठीण बनले आहे
जीवन एक रडगाणे
बनले आहे
जीव माझा इथे
गुदमरतो आहे
कारण चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं आहे
पश्चातापाचा काटा मला
सतत बोचतो आहे
माझंच मन मला
सारखं खात आहे
आतल्या आत माझं हृदय
कळवळून रडत आहे
कारण चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं आहे
या अंधाऱ्या कोठडीत मला
राहायचं नाही आहे
इथला रंग मला लावून
घ्यायचा नाही आहे
चार चौघांसारखं आयुष्य
जगू शकलो नाही आहे
मात्र आता चार चौघांसारखं
तरी मला मरायचं आहे
- प्रतिक देसाई
मनाच्या गाभाय्रात कधी भाव उठतात... कळल्या तर कविता नाहीतर कागदावर ओढलेल्या रेघोट्या वाटतात....
प्रेमाचा दिवा !
तुला पाहिलं त्या दिसी
सूर्योदय जाहला
अंधाऱ्या या आयुष्यात
तुझा प्रकाश पडला
पहिल्यांदाच आयुष्यात असा
काही चमत्कार घडला
काही कळायच्या आताच
प्रेमाचा रोग जडला
क्षणभरही दुरावा मला
सहन नाही झाला
सांगू कसं तुजला की कसा
तुझ्याविन काळ हा सरला
सांगून टाकायचा मनात
विचार पक्का केला
मात्र तुझ्या नकाराच्या
शंकेचा साप नेहमी डसला
दिवसरात्र स्वप्नात तुझाच
चेहरा दिसला
तुझ्या स्वप्नातच
मी हा जन्म जगला
शेवटी न राहवून तुला
सांगण्याचा प्रयत्न केला
पण त्या आधीच तुझ्या
लग्नाचा दिवस उजाडला
तुझ्या प्रेमाचा दिवा मनात
तसाच तेवत राहिला
माझ्या मात्र आयुष्यात पुन्हा
काळोखच माजला
- प्रतिक देसाई

अंधाऱ्या या आयुष्यात
तुझा प्रकाश पडला
पहिल्यांदाच आयुष्यात असा
काही चमत्कार घडला
काही कळायच्या आताच
प्रेमाचा रोग जडला
क्षणभरही दुरावा मला
सहन नाही झाला
सांगू कसं तुजला की कसा
तुझ्याविन काळ हा सरला
सांगून टाकायचा मनात
विचार पक्का केला
मात्र तुझ्या नकाराच्या
शंकेचा साप नेहमी डसला
दिवसरात्र स्वप्नात तुझाच
चेहरा दिसला
तुझ्या स्वप्नातच
मी हा जन्म जगला
शेवटी न राहवून तुला
सांगण्याचा प्रयत्न केला
पण त्या आधीच तुझ्या
लग्नाचा दिवस उजाडला
तुझ्या प्रेमाचा दिवा मनात
तसाच तेवत राहिला
माझ्या मात्र आयुष्यात पुन्हा
काळोखच माजला
- प्रतिक देसाई
माझ्या कोल्हापुरी !
माझ्या कोल्हापुरी,
भगवा फेटा सजतो शिरावर
चालताना वाजे कोल्हापुरी पायताण करकर
माझ्या कोल्हापुरी,
तांबडा पंधरा झणझणीत
लाल तिखट करी त्याची चव चमचमीत
माझ्या कोल्हापुरी,
रंकाळा ,पन्हाळा प्रेक्षणीय
पंचगंगे घाटी ही चार क्षण भासे अविस्मरणीय
माझ्या कोल्हापुरी,
खास राजाभाऊंची भेळ
जिभेवर पाणी आणी फडतरेंची मिसळ
माझ्या कोल्हापुरी,
वसते अंबाबाई थाटात
गणपतीला ही नसे तोड साऱ्या जगतात
माझ्या कोल्हापुरी,
शिवाजी वसतो मनात
शाहूंची ताकत बाळगतो मर्द अंगात
माझ्या कोल्हापुरी,
भाषा खास ठेवणीची
फडावरही सजे नशा त्या लावणीची
माझ्या कोल्हापुरी,
खासबागेत रंगतो कुस्तीचा डाव
ओलम्पिक मध्ये केले अनेकांनी मोठे नाव
माझ्या कोल्हापुरी,
जिवंत असे ती संकृती
जनमनात जपली जाते आजही ती माणुसकी
- प्रतिक देसाई
भगवा फेटा सजतो शिरावर
चालताना वाजे कोल्हापुरी पायताण करकर
माझ्या कोल्हापुरी,
तांबडा पंधरा झणझणीत
लाल तिखट करी त्याची चव चमचमीत
माझ्या कोल्हापुरी,
रंकाळा ,पन्हाळा प्रेक्षणीय
पंचगंगे घाटी ही चार क्षण भासे अविस्मरणीय
माझ्या कोल्हापुरी,
खास राजाभाऊंची भेळ
जिभेवर पाणी आणी फडतरेंची मिसळ
माझ्या कोल्हापुरी,
वसते अंबाबाई थाटात
गणपतीला ही नसे तोड साऱ्या जगतात
माझ्या कोल्हापुरी,
शिवाजी वसतो मनात
शाहूंची ताकत बाळगतो मर्द अंगात
माझ्या कोल्हापुरी,
भाषा खास ठेवणीची
फडावरही सजे नशा त्या लावणीची
माझ्या कोल्हापुरी,
खासबागेत रंगतो कुस्तीचा डाव
ओलम्पिक मध्ये केले अनेकांनी मोठे नाव
माझ्या कोल्हापुरी,
जिवंत असे ती संकृती
जनमनात जपली जाते आजही ती माणुसकी
- प्रतिक देसाई
प्रेमाचा ऋतू

कानामधी कुजबुज करत आहे
हळू हळू हा ऋतू बदलत आहे
माझ्यासंगे हा ऋतू डोलत आहे
कधी काळी पाहिलेले ते स्वप्न
आज जागे होते आहे
धुक्यातला तो धूसर चेहरा
थोडा थोडा दिसतो आहे
पानावरचे ते दव मोत्यापरी
चमकत आहे
आनंदाचे रंग घेवूनी आज
इंद्रधनू आले आहे
प्रेमाचा हा गार वारा मला
थंड करतो आहे
मानाचा पक्षी आज आकाशी
उंच भरारी घेतो आहे
तुझ्या प्रीतीच्या पावसात
चिंब भिजते आहे
कसं रे सांगू गड्या तुजला
तुझ्याच मी प्रेमात आहे
हळू हळू ही हवा बोलत आहे
कानामधी कुजबुज करत आहे
हळू हळू हा ऋतू बदलत आहे
माझ्यासंगे हा ऋतू डोलत आहे ....
-प्रतिक देसाई
Subscribe to:
Posts (Atom)