माझ्या कोल्हापुरी !

माझ्या कोल्हापुरी,
भगवा फेटा सजतो शिरावर
चालताना वाजे कोल्हापुरी पायताण करकर

माझ्या कोल्हापुरी,
तांबडा पंधरा झणझणीत
लाल तिखट करी त्याची चव चमचमीत

माझ्या कोल्हापुरी,
रंकाळा ,पन्हाळा प्रेक्षणीय
पंचगंगे घाटी ही चार क्षण भासे अविस्मरणीय

माझ्या कोल्हापुरी,
खास राजाभाऊंची भेळ
जिभेवर पाणी आणी फडतरेंची मिसळ

माझ्या कोल्हापुरी,
वसते अंबाबाई थाटात
गणपतीला ही नसे तोड साऱ्या जगतात

माझ्या कोल्हापुरी,
शिवाजी वसतो मनात
शाहूंची ताकत बाळगतो मर्द अंगात

माझ्या कोल्हापुरी,
भाषा खास ठेवणीची
फडावरही सजे नशा त्या लावणीची

माझ्या कोल्हापुरी,
खासबागेत रंगतो कुस्तीचा डाव
ओलम्पिक मध्ये केले अनेकांनी मोठे नाव

माझ्या कोल्हापुरी,
जिवंत असे ती संकृती
जनमनात  जपली जाते आजही  ती माणुसकी 
                                                       - प्रतिक देसाई

No comments: