कैद्याची कैफियत !

झाल गेलं सगळ
विसरून जायचं आहे 
पुन्हा नवीन सुरवात
करून पाहायचं  आहे
सदाचाराच्या मार्गावर 
एकदातरी चालायचं आहे
चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं  आहे

सुखाच्या सावलीत दोन
घटका बसायचं आहे
प्रशांत वृक्षाला थोडा 
वेळ टेकायच आहे
मनाच्या समाधानासाठी 
तरी जागून पाहायचं आहे   
चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं  आहे

बाहेरचा मोकळा शवास
मला घ्यायचा आहे
यश काय असत हे
चाखून पाहायचं आहे
एक दिवस तरी ताठ
मानेन वावरायचं आहे
चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं  आहे

एक एक क्षण जगणे
कठीण बनले आहे
जीवन एक रडगाणे
बनले आहे
जीव माझा इथे
गुदमरतो आहे
कारण चार चौघांसारखं  आयुष्य
मलाही जगायचं  आहे

पश्चातापाचा काटा मला
सतत बोचतो आहे
माझंच मन मला
सारखं खात आहे
आतल्या आत माझं हृदय
कळवळून रडत आहे
कारण चार चौघांसारखं आयुष्य
मलाही जगायचं  आहे

या अंधाऱ्या कोठडीत मला
राहायचं नाही आहे
इथला रंग मला लावून
घ्यायचा नाही आहे
चार चौघांसारखं आयुष्य
जगू शकलो नाही आहे
मात्र आता चार चौघांसारखं
तरी मला मरायचं आहे
                                - प्रतिक देसाई  

No comments: