दुःख आणि एकटेपणा हाच
जणू मार्ग आहे प्रवासाचा....
काळोख माजला आहे वाटेवरी
प्रकाश हि नाही चंद्राचा....
झाडही नाही सापडत
थोड्याश्या आधारासाठी....
विहीरही नाही दिसत
पाण्याच्या एका थेंबासाठी....
काटे आणि खड्डेच
आहेत ठेचकळण्यासाठी....
एक दगडही नाही
दोन घटका बसण्यासाठी....
रात्र रात्र चालतो आहे
फक्त एका उजेडासाठी....
मात्र साधी ठिणगीही
नाही वाट दिसण्यासाठी....
उघडे डोळेही बंद
वाटत आहेत मला...
निराशेच्या वाटेवर आशेचा
धूरच दिसत आहे मला...
रक्ताने माखलेले पायही
उठत नाहीत आता...
घश्याची कोरडही
मिटत नाही आता...
काहीच नाही उरले आता,
त्राण ही नाही शरीरात...
फक्त आहे जिद्ध जीला
घेवून चालतो आहे मनात .....
- प्रतिक देसाई
मनाच्या गाभाय्रात कधी भाव उठतात... कळल्या तर कविता नाहीतर कागदावर ओढलेल्या रेघोट्या वाटतात....
आयुष्याच्या पुस्तकाची पाने

अचानक काही महत्वाची पाने सापडली..
ती पाहताच जुनी आठवण पुन्हा जागी झाली...
काही पाने सैल झाली होती
मनाच्या आठवणीत हरवून गेली होती ....
काही थोडी फाटलेली हि होती
नको असतानाही लिहिली गेलेली होती....
काही थोडी डागाळलेली सुद्धा होती
मनावर खोलवर घाव घालून गेलेली होती....
काही आजूनही घट्ट होती
पुन्हा पुन्हा लिहावीत असा आव आणत होती ....
काही पाने कोरी करकरीत होती
कदाचित लिहायचीच राहून गेली होती...
काही सुंदर आणि सुरेख हि निघाली होती
जी चेहऱ्यावर आनंदाचे रंग देवून गेली होती ...
काही पाने अशीही सापडली होती ..
जी दुखाच्या आश्रुत पुसून गेली होती ...
काही पाने चक्क जळकी हि मिळाली होती ...
खरंच ती हृदयाला चटका लावून गेली होती...
आयुष्याच्या पुस्तकाची पाने
विविध छटा दाखवून गेली होती .....
आयुष्य काय असत हेच
जणू शिकवून गेली होती ....
- प्रतिक देसाई
बालभारती

पुन्हा साठवण
आज अचानक झाली
बालभारतीची आठवण....
कित्येक वर्षानंतरहि बालभारती
स्मृतीत राहिली .....
आणि क्षणार्धात
गद्य व पद्यांची चित्रे
डोळ्यांसमोर उभी पाहिली ...
आठवल शंकर पाटलांचं
स्मशानातील सोन हे गद्य
तर आजही विसरलो नाही
तुतारी हे केशवसुतांचे पद्य
उपास,मित्र सारखे गद्य
आजवर कधीच
नाही पहिले.....
आम्ही कोण, पारवा, कणा
सारखे पद्य मात्र मनात घर
करून राहिले...
सुरवातीची प्रस्तावना वाचण्यातही
वेगळीच मजा असायची .....
मात्र पाठीमागची उत्तरे लिहिणे
हि एक सजा असायची.....
स्वर्गीय वाटणारा तो मराठीचा तास
आजही आठवला की मन होते झकास
मात्र पुन्हा ते बालभारती भेटणार नाही
म्हणून मन होते उदास ....
कितीही मोठे झालो
कितीही बुकं वाचली
तरी त्यानां नाही तो मान
खरंच कुठल्याच बुकांना कधीच
येणार नाही बालभारतीची शान.....
काही झालो, कुठेही गेलो तरी
कधीच विसरू शकत नाही बालभारती..
मराठीचा रथ अखंडपणे चालविणारा
त्यासारखा दुसरा नाही सारथी .....
- प्रतिक देसाई
गोंधळलेला मी .....
आजकाल खरच काय होतंय,
ते कळतच नाही.
दिवस आणि रात्रीतलं,
फरकच कळतच नाही .
काय करतो आहे हे समजत नाही,
आणि काय कराव हे उमगत नाही....
नभातील चांदण, एखादी वाऱ्याची झुळूक ,
आणि रातराणीचा सुवास
या गोष्टींकडेच जास्त लक्ष देतो मी
आणि आपसूकच माझ्यातलाच मी हरवून जातो मी ....
माझ्यातला मी सापडतच नाही मला,
तहान आणि भूक लागताच नाही मला...
तरीही मन व्याकूळ होत कुणासाठी ,
दिवस-रात्र जीव झुरतो जिच्यासाठी ....
डोळ्यांसमोर एकच चेहरा,
आणि कानामद्धे एकच आवाज घुमतो प्रत्येकवेळी,
आणि वेळे वरची कामेही करतो मी अवेळी ....
यालाच जर प्रेम म्हणत असतील ,
तर होय खरच मी प्रेमात आहे .
जी गोड हसते आहे,
थोडीशी लाजते आहे,
फक्त माझ्यासाठी....
-प्रतिक देसाई
ते कळतच नाही.
दिवस आणि रात्रीतलं,
फरकच कळतच नाही .
काय करतो आहे हे समजत नाही,
आणि काय कराव हे उमगत नाही....
नभातील चांदण, एखादी वाऱ्याची झुळूक ,
आणि रातराणीचा सुवास
या गोष्टींकडेच जास्त लक्ष देतो मी
आणि आपसूकच माझ्यातलाच मी हरवून जातो मी ....
माझ्यातला मी सापडतच नाही मला,
तहान आणि भूक लागताच नाही मला...
तरीही मन व्याकूळ होत कुणासाठी ,
दिवस-रात्र जीव झुरतो जिच्यासाठी ....
डोळ्यांसमोर एकच चेहरा,
आणि कानामद्धे एकच आवाज घुमतो प्रत्येकवेळी,
आणि वेळे वरची कामेही करतो मी अवेळी ....
यालाच जर प्रेम म्हणत असतील ,
तर होय खरच मी प्रेमात आहे .
जी गोड हसते आहे,
थोडीशी लाजते आहे,
फक्त माझ्यासाठी....
-प्रतिक देसाई
एकदा तरी
एकदा तरी आकाशात घार बनून उडायचं आहे
वरून सर्व श्रुष्टी कशी दिसते ते पाहायचं आहे
साऱ्या आकाशावर राज्य करायचं आहे
एकदा तरी पाण्यात मासा बनून पोहायच आहे
पाण्यातील जग काय आहे हे अनुभवायचं आहे
साऱ्या समुद्राशी एकरूप व्हायचं आहे
एकदा तरी फुलपाखरू बनायचं आहे
फुलातील मध चाखायचा आहे
संपूर्ण बागेत भ्रमण करायचं आहे
एकदा तरी वारा होवून पाहायचं आहे
दर्याखोर्यातून बेभान होवून वाहायच आहे
मनाला वाटेल तिकडे जायचं आहे
एकदा तरी सचिन होवून पाहायचं आहे
मैदानावर जावून cover drive मारायचा आहे
क्रिकेट चा देव होवून पाहायचं आहे
एकदा तरी SRK ह्यायच आहे
एकदा तरी पडद्यावर झळकायच आहे
bollywood चा बादशाह होवून बघायचं आहे
एकदा तरी जवान होवून सीमेवर जायचं आहे
धैर्याने शत्रूचा मुकाबला करायचा आहे
आणि देशासाठी लढताना अमर ह्यायच आहे.
काही झाल कितीही झाल तरी मात्र शेवटी
मला मी बनूनच राहायचं आहे
आणि मी बनूनच मारायचं आहे
- प्रतिक देसाई
वरून सर्व श्रुष्टी कशी दिसते ते पाहायचं आहे
साऱ्या आकाशावर राज्य करायचं आहे
एकदा तरी पाण्यात मासा बनून पोहायच आहे
पाण्यातील जग काय आहे हे अनुभवायचं आहे
साऱ्या समुद्राशी एकरूप व्हायचं आहे
एकदा तरी फुलपाखरू बनायचं आहे
फुलातील मध चाखायचा आहे
संपूर्ण बागेत भ्रमण करायचं आहे
एकदा तरी वारा होवून पाहायचं आहे
दर्याखोर्यातून बेभान होवून वाहायच आहे
मनाला वाटेल तिकडे जायचं आहे
एकदा तरी सचिन होवून पाहायचं आहे
मैदानावर जावून cover drive मारायचा आहे
क्रिकेट चा देव होवून पाहायचं आहे
एकदा तरी SRK ह्यायच आहे
एकदा तरी पडद्यावर झळकायच आहे
bollywood चा बादशाह होवून बघायचं आहे
एकदा तरी जवान होवून सीमेवर जायचं आहे
धैर्याने शत्रूचा मुकाबला करायचा आहे
आणि देशासाठी लढताना अमर ह्यायच आहे.
काही झाल कितीही झाल तरी मात्र शेवटी
मला मी बनूनच राहायचं आहे
आणि मी बनूनच मारायचं आहे
- प्रतिक देसाई
प्रेम !
आयुष्यात एकदा तरी प्रेम कराव
आपण कुणावरतरी मरावं
कुणीतरी आपल्यासाठी जागावं
जीवनाची वाट एकसाथ चालावं
कष्टाची भाकरी आनंदानी खाव
आपलं खोपट महाल समाजाव
आणि त्यात दोघांनी सुखानं नांदाव
प्रेम मधापारी फक्त गोड नसाव
खारट, तुरट,आंबट, आणि तिखट असावं
प्रेम हे कापसापरी फक्त मऊ हि नसाव
गरजेवेळी ते दगडापरी कठीण हि असावं
प्रेम हे नभाप्रमाणे अमर्याद असावं
सागराप्रमाणे अथांग असावं
मात्र ते फक्त निळंशारच नसाव
तर इंद्रधनुपरी विविधरंगी असावं
प्रेम उन्हात कडकडीत तापाव
पावसात चिंब भिजावं
थंडीत कुडकुडून गारठाव
कारण बाराही महिने ते तसच रहावं
प्रेमात जात-पात, उच-नीच बंधन नसावं
तर ते सुखशांती,भावनांचं आंगण असावं
प्रत्येकान आपापल्या परीन प्रेम करावं
पण प्रत्येक जीवान एकदातरी प्रेम करावं.
-प्रतिक देसाई
आपण कुणावरतरी मरावं
कुणीतरी आपल्यासाठी जागावं
जीवनाची वाट एकसाथ चालावं
कष्टाची भाकरी आनंदानी खाव
आपलं खोपट महाल समाजाव
आणि त्यात दोघांनी सुखानं नांदाव
प्रेम मधापारी फक्त गोड नसाव
खारट, तुरट,आंबट, आणि तिखट असावं
प्रेम हे कापसापरी फक्त मऊ हि नसाव
गरजेवेळी ते दगडापरी कठीण हि असावं
प्रेम हे नभाप्रमाणे अमर्याद असावं
सागराप्रमाणे अथांग असावं
मात्र ते फक्त निळंशारच नसाव
तर इंद्रधनुपरी विविधरंगी असावं
प्रेम उन्हात कडकडीत तापाव
पावसात चिंब भिजावं
थंडीत कुडकुडून गारठाव
कारण बाराही महिने ते तसच रहावं
प्रेमात जात-पात, उच-नीच बंधन नसावं
तर ते सुखशांती,भावनांचं आंगण असावं
प्रत्येकान आपापल्या परीन प्रेम करावं
पण प्रत्येक जीवान एकदातरी प्रेम करावं.
-प्रतिक देसाई
तिच्याशिवाय...
कितीही वेळा सांगितलं,
तरी तिला पटत नाही.
माझी तिच्यावरची प्रीत,
तिला कळत नाही.
जाणून बुजून करते आहे
ती हा वेडेपणा,
का खरच तिला माझ्या
भावनांची कदर नाही.
कधी कधी वाटत,
शेवट करावा सगळ्याचा,
मात्र तिच्यावाचून श्वास,
घेणंही जमत नाही.
कदाचित तीच घेत,
असेल माझी परीक्षा,
कारण या जगात शुद्ध प्रेम,
सहजासहजी मिळत नाही.
तिच्यसाठी क्शितीजापर्यान्तही.
करेन मी प्रतीक्षा .
काय करू आता तिच्याशिवाय,
जगणेच जमत नाही.
- प्रतिक देसाई
तरी तिला पटत नाही.
माझी तिच्यावरची प्रीत,
तिला कळत नाही.
जाणून बुजून करते आहे
ती हा वेडेपणा,
का खरच तिला माझ्या
भावनांची कदर नाही.
कधी कधी वाटत,
शेवट करावा सगळ्याचा,
मात्र तिच्यावाचून श्वास,
घेणंही जमत नाही.
कदाचित तीच घेत,
असेल माझी परीक्षा,
कारण या जगात शुद्ध प्रेम,
सहजासहजी मिळत नाही.
तिच्यसाठी क्शितीजापर्यान्तही.
करेन मी प्रतीक्षा .
काय करू आता तिच्याशिवाय,
जगणेच जमत नाही.
- प्रतिक देसाई
मनं !
भावनांचं जाळ असतं
मनं स्वप्नांच्या दुनियेत राहत
भावनांच्या सावलीत बसत
मनं आठवणींच्या कुशीत निजत
ते आपल्याच स्वर्गात वावरत
मनं प्रेमाच्या पावसात भिजत
आनंदाच्या रंगत रंगत
मनं दुःखाच्या ज्वाळात जळत
तरी आपलं आपणच सावरत
मनं आकाशाला गवसणी घालत
वाऱ्याबरोबर स्पर्धा करत
मनं सागराच्या लाटांवर स्वार होत
ते अस्तित्वाच्या जगात कधीच नसतं
म्हणूनच मनं वेड भोळ असतं.......
- प्रतिक देसाई
- प्रतिक देसाई
अशी काही तू...
अशी काही हसतेस तू
जणू काही आनंदाची चौफेर उधळणच करतेस तू ....
जणू श्रुष्टीला नवचैतन्यच बहाल करतेस तू.......
अशी काही लाजतेस तू....
जणू वसंताचे आगमनच करतेस तू...
जणू काही हृदयच घायाळ करतेस तू....
अशी काही बोलतेस तू...
सरळ मनालाच जावून भिडतेस तू .....
हृदयावरच राज्य करतेस तू....
अशी काही गातेस तू...
जणू काही माधुर्यचं पसरतेस तू ...
ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करतेस तू...
अशी काही आहेस तू...
जणू काही स्वर्गातील परीच तू..
खरंच गं तुझ्यासारखी तूच तू , तूच तू....
- प्रतिक देसाई
जणू काही आनंदाची चौफेर उधळणच करतेस तू ....
जणू श्रुष्टीला नवचैतन्यच बहाल करतेस तू.......
अशी काही लाजतेस तू....
जणू वसंताचे आगमनच करतेस तू...
जणू काही हृदयच घायाळ करतेस तू....
अशी काही बोलतेस तू...
सरळ मनालाच जावून भिडतेस तू .....
हृदयावरच राज्य करतेस तू....
अशी काही गातेस तू...
जणू काही माधुर्यचं पसरतेस तू ...
ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करतेस तू...
अशी काही आहेस तू...
जणू काही स्वर्गातील परीच तू..
खरंच गं तुझ्यासारखी तूच तू , तूच तू....
- प्रतिक देसाई
तुझी दसऱ्याची शुभेच्छा !
तुझी दसऱ्याची शुभेच्छा मनात
वसली....
खोल काळजात जावून कुठ रुतून
बसली...
तुझं ते आपटयाच पान जपून
ठेवलं ....
सोन्याहूनही ते मला मौल्यवान
वाटल...
तुझ्या आवाजातील गोडवा आजूनही आहे
कानात ...
तुझा तो लडीवालपणा आजूनही आहे
ध्यानात .....
जस रानात हिरवं पिकून
डोलल ....
तसं माझ मन तुला ऐकून
झुलल....
जणू वसंतातल गान कोकिळेन
गायल...
तसं काही मला तुझं बोल
भासल...
तुझं कालच बोलण माझ्या स्वप्नातही
गाजलं...
रुसलेल माझ वेड मन हळूच खुदकन
हसलं .......
- प्रतिक देसाई
वसली....
खोल काळजात जावून कुठ रुतून
बसली...
तुझं ते आपटयाच पान जपून
ठेवलं ....
सोन्याहूनही ते मला मौल्यवान
वाटल...
तुझ्या आवाजातील गोडवा आजूनही आहे
कानात ...
तुझा तो लडीवालपणा आजूनही आहे
ध्यानात .....
जस रानात हिरवं पिकून
डोलल ....
तसं माझ मन तुला ऐकून
झुलल....
जणू वसंतातल गान कोकिळेन
गायल...
तसं काही मला तुझं बोल
भासल...
तुझं कालच बोलण माझ्या स्वप्नातही
गाजलं...
रुसलेल माझ वेड मन हळूच खुदकन
हसलं .......
- प्रतिक देसाई
तु
वाऱ्यापरी मनमोकळी ...............तु
पहाटेची किरणे कोवळी ..............तु
आकाश ते पातळ .................... तु
मधापरीस गोड मधाळ ............. तु
रातराणीचा सुगंध ................... तु
सारीतापरी संथ ..................... तु
पर्वतापरी विशाल मन .............. तु
पुष्पपरी कोमल तन ................ तु
वसंतातील श्रुष्टी ..................... तु
कल्पनेपलीकडील दृष्टी ............. तु
पानावरील दव ...................... तु
उमललेलं फुल नवं ................ तु
अप्सरेहूनही सुंदर भासते ......... तु
आणि ठायीठायी वावरते .......... तु
निसर्गाची प्रेरणा ................... तु
देवाची आराधना ................... तु
ताऱ्यापरी तेजस्वी नयन ......... तु
नभातल ताज चांदण ............. तु
माझी एकुलती एक रमन ......... तु
चारही दिशात ....................... तु
आनंदाची जणू लाट .............. तु
झऱ्यापरी खळखळ ............... तु
ग्रीष्मातल मृगजळ ............... तु
सागरापरी खोल ................... तु
कोकिळेपरी बोल ................. तु
मीनपरी चंचल .................... तु
सीतेपरी पवित्र .................... तु
पुनवेची आहे रात्र ................. तु
शब्द खुंटले, ओठ शिवले,
अशी काही जणू आहेस........ तु
- प्रतिक देसाई
- प्रतिक देसाई
फक्त तुझ्यासाठी....
एक हास्य उमटते ......फक्त तुझ्यासाठी
एक चेहरा खुलतो......फक्त तुझ्यासाठी
एक अविस्मरणीय भेट ...फक्त तुझ्यासाठी
एक मार्ग चालतो....... फक्त तुझ्यासाठी
एक मंझील दिसते ... फक्त तुझ्यासाठी
एका रस्त्यावर वाट पाहतो...फक्त तुझ्यासाठी
एक स्वप्न पाहतो..........फक्त.तुझ्यासाठी
एक प्रार्थना देवाकडे.....फक्त तुझ्यासाठी
एक जन्म घेतला..... फक्त तुझ्यासाठी
एक आयुश्य जगतो .... फक्त तुझ्यासाठी
एक मन झुरते .....फक्त तुझ्यासाठी
एक जीवन कुर्बान.....फक्त तुझ्यासाठी
एक आत्मा तळमळतो....फक्त तुझ्यासाठी
खरंच फक्त तुझ्यासाठी....फक्त तुझ्या आणि तुझ्याचसाठीएक चेहरा खुलतो......फक्त तुझ्यासाठी

एक मार्ग चालतो....... फक्त तुझ्यासाठी
एक मंझील दिसते ... फक्त तुझ्यासाठी
एका रस्त्यावर वाट पाहतो...फक्त तुझ्यासाठी
एक स्वप्न पाहतो..........फक्त.तुझ्यासाठी
एक प्रार्थना देवाकडे.....फक्त तुझ्यासाठी
एक जन्म घेतला..... फक्त तुझ्यासाठी
एक आयुश्य जगतो .... फक्त तुझ्यासाठी
एक मन झुरते .....फक्त तुझ्यासाठी
एक जीवन कुर्बान.....फक्त तुझ्यासाठी
एक आत्मा तळमळतो....फक्त तुझ्यासाठी
- प्रतिक देसाई
Subscribe to:
Posts (Atom)