
पुन्हा साठवण
आज अचानक झाली
बालभारतीची आठवण....
कित्येक वर्षानंतरहि बालभारती
स्मृतीत राहिली .....
आणि क्षणार्धात
गद्य व पद्यांची चित्रे
डोळ्यांसमोर उभी पाहिली ...
आठवल शंकर पाटलांचं
स्मशानातील सोन हे गद्य
तर आजही विसरलो नाही
तुतारी हे केशवसुतांचे पद्य
उपास,मित्र सारखे गद्य
आजवर कधीच
नाही पहिले.....
आम्ही कोण, पारवा, कणा
सारखे पद्य मात्र मनात घर
करून राहिले...
सुरवातीची प्रस्तावना वाचण्यातही
वेगळीच मजा असायची .....
मात्र पाठीमागची उत्तरे लिहिणे
हि एक सजा असायची.....
स्वर्गीय वाटणारा तो मराठीचा तास
आजही आठवला की मन होते झकास
मात्र पुन्हा ते बालभारती भेटणार नाही
म्हणून मन होते उदास ....
कितीही मोठे झालो
कितीही बुकं वाचली
तरी त्यानां नाही तो मान
खरंच कुठल्याच बुकांना कधीच
येणार नाही बालभारतीची शान.....
काही झालो, कुठेही गेलो तरी
कधीच विसरू शकत नाही बालभारती..
मराठीचा रथ अखंडपणे चालविणारा
त्यासारखा दुसरा नाही सारथी .....
- प्रतिक देसाई
4 comments:
aawadaliiiiii........!
dhanyawad !
mast re bal bharti ajun athvan yete
mast re bal bharti ajun athvan yete
Post a Comment