प्रेम !

आयुष्यात एकदा तरी प्रेम कराव
आपण कुणावरतरी मरावं
कुणीतरी आपल्यासाठी जागावं

जीवनाची वाट एकसाथ चालावं
कष्टाची भाकरी आनंदानी खाव
आपलं खोपट महाल समाजाव
आणि त्यात दोघांनी सुखानं नांदाव

प्रेम मधापारी  फक्त गोड नसाव
खारट, तुरट,आंबट, आणि तिखट असावं
प्रेम हे कापसापरी फक्त मऊ हि नसाव
गरजेवेळी ते दगडापरी कठीण हि असावं

प्रेम हे नभाप्रमाणे अमर्याद असावं
सागराप्रमाणे अथांग असावं
मात्र ते फक्त निळंशारच नसाव
 तर इंद्रधनुपरी विविधरंगी असावं

प्रेम उन्हात कडकडीत तापाव
पावसात चिंब भिजावं
थंडीत कुडकुडून गारठाव
कारण बाराही महिने ते तसच रहावं

प्रेमात  जात-पात, उच-नीच  बंधन नसावं
तर  ते सुखशांती,भावनांचं आंगण असावं
प्रत्येकान आपापल्या परीन प्रेम करावं
पण प्रत्येक जीवान एकदातरी प्रेम करावं.
                                                   -प्रतिक देसाई

No comments: