गल्लीतलं क्रिकेट !


गल्लीतलं क्रिकेट काही वेगळच असतं
खेळ कमी आणि आरडा ओरडा करणार मच्छी मार्केट असतं...
इथले  असतात वेगळेच नियम
जिंकेल त्याचीच असते पहिली  batting कायम...
एक टप्पा आऊट, दोन डीक्लीअर असे इथे प्रकार
आऊट होता तुम्ही जर चुकून मारली षटकार....
तीन वेळा अंगाला बॉल लागला तर आऊट
किंवा तीन वेळा बॉल मारताना हुकला तरीही आऊट....
इथले संघ सामन्यागणिक बदलतात
आणि सामन्याच्या ओवर प्रकाश्यावरून ठरतात....
ज्याची असेल bat तोच इथे राजा
आणि ज्याचे काहीच नाही त्याला फिल्डिंगची सजा...
ना पंच, ना प्रेक्षक कोणीच तिथे
भिंतीची स्टंप, अडचणीवेळी फळीची bat ही  इथे...
गल्लीतलं क्रिकेट बंद असतं परीक्षेच्या वेळी
आणि सुट्टीत मात्र चालत खांबाच्या उजेडात रात्रीच्याही वेळी...
चिडाचिडी तर इथे नेहमीची
आणि जास्तच झाल तर प्रात्याक्षिके कुस्तीची...
मात्र शेवटी किती काही झाल तरी मरत नाही इथलं क्रिकेट
तेच तर आहे इथलं मोठ्ठ सिक्रेट ...... 
                                                                -  प्रतिक देसाई  

No comments: